महिलेची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  पारनेर तालुक्यांत एका चाळीस वर्षीय महिलेने शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.तालुक्यातील खडकवाडी येथे हि घटना घडली आहे.

जनाबाई पोपट दुधावडे वय 40 वर्ष राहणार कुरण वस्ती खडकवाडी तालुका पारनेर. हि दि. 3 रोजी रात्री 3.00 वाजता राहत्या घरातून बाहेर पडून शंकर काशिनाथ मोरे यांच्या कामटवाडी शिवर येथील शेतीच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सकाळी 08.30 वा महिलेचा मुलगा बाळू याने तिचा शोध घेतला असता त्यांना ही महिला गळफास घेतल्याचे आढळून आले. पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथे रवाना केले असून शवीविच्छेदना नंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment