जामखेड तालुक्यात राजकीय वादळ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : तीन महिन्यांपासून जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

त्यांच्यासह दहा नगरसेवकांनी नगरसेवकपदांचा राजीनामापत्र नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे सोपवले आहेत, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबावतंत्र चालू होते.

लाॅकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसांत पुन्हा सुरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली,

त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रिती विकास राळेभात, नगरसेवक शामिर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात,

सुमन अशोक राळेभात, मेहरुनिसा शफी कुरेशी, जकिया आयुब शेख या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे घायतडक यांच्याकडे दिले.

गेल्या तीन महिन्यांपासून माझ्यावर नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून राजकीय दबाव आणला जात आहे. तसेच हा दबाव वाढत जात असल्याने मी स्वतः जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करणार आहे. तसेच माझ्यामुळे दहा नगरसेवकांनी देखील आपल्या नगरसेवकपदांचा राजीनामा माझ्याकडे सुपुर्द केला. ” निखिल घायतडक, नगराध्यक्ष, जामखेड.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment