कोरोना बाधित असल्याची अफवा पसरवल्याने ‘त्यांना’ सहन करावा लागला मनस्ताप !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेवगाव तालुक्यातील बोधेगावातील एक ७ वर्षीय चिमुरडीला लक्षणे नसताना केवळ संशयित म्हणून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र अहवाल येण्याआधीच गावातील काहीनी संबंधित चिमुरडी बाधित असल्याची अफवा गावभर पसरवली.

यामुळे संबंधित कुटुंबासह त्यांच्या संपर्कात असलेल्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव येथे कल्याणहून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील ५ जणांना तपासणीसाठी गुरूवारी जिल्हा रूण्णालयात पाठविले होते.

तसेच बोधेगाव येथील एक सात वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी रात्री उशिरा या ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिरानी यांनी दिली.

कल्याणहून विनापरवानगी राणेगावात आलेल्या दुसऱ्या 3२ वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदार अर्चना पागिरे, ‘पोलोस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,

डॉ.सलमा हिरानी यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी राणेगावात दाखल झाले. रुग्ण वास्तव्यास असलेल्या परिसरात औषध फवारणी केली असून, घरोघरी सारीचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment