अहमदनगर ब्रेकिंग : त्या महिलेचा खूनच…शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

याबायत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी निंबळक बायपासजवळील काटवनात ‘एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता.

पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होता. सोमवारी हा अहवाल प्राप्त झाला. त्यात ओढणीने गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

याप्रकरणी पोहेकॉ खंडू लाळगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या परिसरात टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेलो नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment