चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एकाच दिवशी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या आता 15 झाली आहे.

काल संगमनेर शहरातील नायकवाडपुरा व मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक, तालुक्यातील शेडगाव येथील एक,तसेच राहाता तालुक्यातील एक अशा चार कोरोनाबाधितांचा उपचार सुरू असतानाच मंगळवारी मृत्यू झाला.

मंगळवारी जिल्ह्यात आणखी 9 नवीन कोरोनाबाधित आढळले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 5, राहाता व नगर तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. या नऊ बाधितांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 226 वर पोचली आहे.

संगमनेर शहरातील नायकवाडपुरा येथील 63 वर्षीय आणि मोमीनपुरा भागातील जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ राहणार्‍या 65 वर्षीय वृद्ध महिलांना 5 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती .

या दोघींवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.9) सकाळी उपचार सुरू असतानाच या दोघींचा मृत्यू झाला.

तसेच संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे मुंबईवरून आलेल्या एका 63 वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी तीन कोरोनाबाधित वृध्द महिलांचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या

व राहाता तालुक्यातील निमगाव येथील 55 वर्षीय महिलेचा उपचार सरू असतानाच मंगळवारी मृत्यू झाला आहे. या घटनेने राहाता परिसरातही खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment