अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज आणखी ०६  रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत.

शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण.

याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय आणि ३२ वर्षीय पुरुष असे तिघे बाधित. रेल्वे स्टेशन भागातील महिलेला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने ती दवाखान्यात दाखल झाली होती

केडगाव येथील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. एमआयडीसी भागातील बाधित व्यक्ती सारीची लक्षणे जाणवल्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता.

त्यानंतर त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

राहाता शहरातील तिघेही बाधित हे यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment