Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthMaharashtraSpacial

देशातील सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहवर कोरोनाचे संकट !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे  लाखो भक्तांच्या उपस्थितीच्या उच्चांकीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या यंदाच्या १७३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे.

दरम्यान परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. श्रीरामपूर शहराजवळ शिरजगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगर,औरंगाबाद,पुणे,नाशिक मराठवाड्यातील सुमारे १० लाख भाविक या सप्ताहात सहभागी होतात. सप्ताहात प्रत्येक वर्षी गर्दीचे नवनवीन विक्रम मोडले जातात,पंगतीला बसून आमटी भाकरी खाण्याचा आनंद फारच वेगळा आहे. याशिवाय पुरणपोळी मांडे एकादशीला उपवासाची खिचडी आणि शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व बुंदीच्या प्रसादाने सप्ताहाची सांगता होते.

भाविकांना बरोबरच राज्याचे अनेक मंत्री,आमदार,खासदार नेते या सप्ताहाला हजेरी लावतात.योगिराज गंगागिरी महाराज यांनी सरला बेटावर आठ ते दहा भाविकांमध्ये सप्ताहाची सुरुवात केली होती, आणि आजही कायम आहे.

त्यांच्या निधनानंतर १९५७ पासून या बेटाचे महंत सदगुरू नारायणगिरी महाराज यांनी सप्ताहाची व्याप्ती वाढविण्यासाठी लोकांचा सहभाग घेतला.त्यामुळे त्याचे महत्त्व वाढत गेले. त्यांच्या निधनानंतर रामगिरी महाराज यांनी २००९ सालापासून त्याची जबाबदारी स्वीकारली,

यावर्षी कोरणाचे संकट आहे.सप्ताहाला लाखो भाविक सहभागी होतात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे कठीण आहे,अशा स्थितीत प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही,असे असले तरी सप्ताहाची परंपरा खंडित करता येणार नाही.

यासाठी सराला बेटावर भाविकांमध्ये सप्ताह करावा लागणार आहे,म्हणजे गंगागिरी महाराज यांनी जेव्हा ही परंपरा सुरु केली, त्यावेळी दहा ते पंधरा भाविक होते, त्या नंतर बेटावर पंधरा ते वीस लोकांच्या उपस्थितीत सप्ताह घ्यावा लागेल हा योगायोगच म्हणावा लागेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button