Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी ‘असा’ साजरा केला त्यांचा वाढदिवस !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळाला अभिवादन करुन आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमिवर कोणत्‍याही कार्यक्रम आणि सत्‍काराचे नियोजन न करण्‍याचे कार्य‍कर्त्‍यांना केलेल्‍या आवाहानाला कार्यकर्त्‍यांनीही तसाच प्रतिसाद देवून सामाजिक संदेश दिला.

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या वयाची ६१ वर्षे पुर्ण करुन ६२व्‍या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी आ.विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो.

यापुर्वी वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने जलक्रांती अभियान, शिर्डी मतदार संघात मोफत अपघात विमा योजना तसेच जिल्‍ह्यातील आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबियांसाठी दत्‍तक योजना सुरु करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती.

यंदा मात्र कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर वाढदिवस साजरा करणार नसल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले होते. वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने सत्‍कार आणि कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळून हा निधी पीएम केअर फंडासाठी देण्‍याचे आवाहन त्‍यांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले होते.

आ.विखे पाटील यांनी आज सर्व सत्‍कार सोहळ्यांना फाटा देवून सकाळीच प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे प्रणेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळावर पुष्‍पाजंली अर्पण करुन अभिवादन केले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते. या वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांमधुन केलेल्‍या आवाहानाला कार्यकर्ते

आणि हितचिंतकांनीही तेवढाच सकारात्‍मक प्रतिसाद देवून आपल्‍या नेत्‍याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करुन आरोग्‍य, पोलिस विभागातील आधिकारी कमर्चा-यांना कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर युवकांनी मास्‍क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्‍यात आले.

दरम्‍यान आ.विखे पाटील यांना वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्‍यक्ष आ.चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्‍हाण, जेष्‍ठनेते आणि माजीमंत्री मधुकरराव पिचड,

माजीमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे, हर्षवर्धन पाटील, आ.रोहित पवार, आ.जयकुमार गोरे, आ.बबनराव पाचपुते, आ.राम सामपुते, आ.रणजीत मोहीते, आ.विकास कुंभारे,

राज्‍य सहकारी बॅंकेचे चेअरमन विद्याधर अनास्‍कर, व्‍हाईस चेअरमन बाळासाहेब सरनाईक, पद्मश्री पोपटराव पवार, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगर शहर जिल्‍हाध्‍यक्ष भैय्या गंधे,

प्रा.भानुदास बेरड, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र फाळके, जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्‍हा पो‍लिस आधिक्षक अखिलेश सिंह, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी शिवराज पाटील यांनी दुरध्‍वनीवरुन शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button