‘तो’रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत शाळा रहाणार बंदच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील एकही शाळा भरवणार नाही.

या बाबतचा ठराव १२ जूनला झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली.

दरवर्षी १५ जूनपर्यंत सर्व शाळा सुरू होतात, परंतु या वर्षी कोरोनामुळे शाळा उघडण्याची तारिख पंधरा ऑगस्टपर्यंत पुढे जाऊ शकते.

जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा होईपर्यंत शाळा सुरु करू नये, अशी मागणी पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली होती.

सद्यस्थितीत सर्व जि. प. शाळा संशयित रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणासाठी दिलेल्या आहेत.

वर्गखोल्या व स्वच्छतागृह अस्वच्छ झाले आहेत. तेथे जर शाळा भरवली, तर आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment