Ahmednagar NewsBreaking

कर्जदारांना दिलासा : लॉकडाऊनमध्ये कर्जवसुली नाही

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.३० जूनपर्यंत किंवा लॉकडाऊन वाढल्यास ते संपेपर्यंत कठोर पद्धतीने कर्जवसुली न करण्याच्या पतसंस्था फेडरेशनने घेतलेल्या या निर्णयामुळे, लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

मात्र ठेवींवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजही न देण्याचा निर्णण राज्य पतसंस्था फेडरेशनच्या बैठकीत घेतला. अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा सहकारी स्थैर्यानिधी संघ व जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या संयुक्तपणे स्थैर्यानिधी संघाच्या संचालक मंडळाच्या बैठक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

नंतर कोयटे बोलत होते. लॉकडाऊनमध्ये पतसंस्थांच्या ठेवींमध्ये किमान ५ टक्यांनी वाढ झाली आहे.

या संकटकाळात जिल्ह्यातील कोणत्याही पतसंस्थेने ठेवीवर ९ टक्क्यापेक्षा अधिक दराने व्याज देऊ नये. त्याचप्रमाणे किमान ३० जूनपर्यंत किंवा लॉकडाऊन वाढल्यास पतसंस्थांनी कर्जाची कठोर पद्धतीने थकीत कर्ज वसुली न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button