अहमदनगर ब्रेकिंग : 7 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांचा आकडा झाला @276!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज सातने वाढ झाली आहे, आज संध्याकाळी कोरोनाचे चार रुग्ण वाढले असून सकाळी तीन रुग्ण आढळले होते.  

त्यामुळे आज अखेर जिल्ह्याची एकूण कोरोना ग्णसंख्या २७६ झाली असून ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत.

जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत  सायंकाळी o४ ने वाढ

पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची बाधा.

कोल्हेवाडी (संगमनेर) येथील१८ वर्षीय युवती बाधित

माणिकदौंडी (पाथर्डी) येथील ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. कुर्ला नेहरूनगर, मुंबई येथे चालक म्हणून काम करत होता.

भोयरे पठार येथील ३३ वर्षीय व्यक्तिलाही कोरोणाची लागण. ही व्यक्तीही मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होती.

आज सकाळी ०३ बाधित व्यक्ती आढळल्या.

पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.

कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल.

याशिवाय, संगमनेर येथील दोघा जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता तसेच नवनागापूर अहमदनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पॉझिटिव आला आहे.

या तीन रुग्णांची आयसीेएमआर पोर्टल वर जिल्ह्याच्या संख्येत नोंद झाली आहे. त्यामुळे या तीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण  रुग्ण संख्येत पडली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज कोरोनातून बरा होऊन गेला घरी. संगमनेर येथील रुग्णाला मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २२०

*

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment