Ahmednagar NorthMaharashtraSpacial

साईबाबांनी सांगितलेली ‘ही’ अकरा वचने लक्षात ठेवली तर तुमच्यावर कोणतेच संकट येणार नाही !

शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे. साईंचे भक्त संपूर्ण जगभर पसरले आहेत. साईंच्या मंदिरात  भक्तगण लाखोंची देणगी देतात. जो एकदा शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन येतो तो कायमचा साई बाबांचा होऊन जातो. आज आपण जाणून घेऊयात शिर्डी साईबाबांच्या महिमेविषयी, त्यांच्या विषयी… 

 • – साई बाबा एक अवतारी पुरुष आहेत. त्यांना देवाचे एक रूप मानले जाते.
 • – ते भक्ती परंपरेचे प्रतीक मानले जातात.
 • – साईबाबांचा जन्म आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी अद्याप अज्ञात आहेत.
 • – त्यांचे मूळ ठिकाण महाराष्ट्रातील शिर्डी आहे, जेथे भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात.
 • –  प्रत्येक धर्मात साईबाबांचे भक्त आहेत.
 • – गुरुवारी साईची विशेष पूजा केली जाते.
 • – त्यांची गुरु म्हणून उपासना करणे उत्तम मानले गेले आहे.

 साई बाबांच्या भक्तीविषयी

 •  – साई बाबांनी एकच ईश्वर ही संकल्पना मंडळी आहे. तसेच श्रद्धा आणि सबुरी यावर त्यांचा विशेष भर आहे.
 • – साईबाबांचे अकरा वचन भक्तांसाठी मोठे  तत्वज्ञानाचे भांडार आहे.
 • – या अकरा वचनांमध्ये जीवनाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण दडलेले आहे.
 • – हे अकरा वचन म्हणजे साईबाबांचे अकरा वरदान आहेत.
 • – या वचनांमध्ये स्वतः अध्यात्माची मोठी शिकवण आहे.

साईबाबांचे अकरा वचन आणि त्यांचे अर्थ-

पहिले वचन : जो शिर्डीला येईल त्याच्यावरील आपत्ती टळून जाईल

– साई बाबांचे  लीला स्थळ शिर्डी आहे. शिर्डी येथे आल्यामुळे सर्व समस्या दूर होतील, असे साई म्हणतात. जे शिर्डीला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी साई मंदिरात जाणेही पुरेसे असेल.

दुसरे वचन : चढ़े समाधि की सीढ़ी पर, पैर तले दुख की पीढ़ी पर.’

– साईबाबांच्या समाधीवर पाय ठेवताच भक्ताचे दु: ख दूर होईल. साई मंदिरात प्रतिकात्मक समाधींचे दर्शन देखील दु: ख दूर करतात, परंतु मनात श्रद्धा भाव पाहिजे.

तिसरे वचन : ‘मी माझे शरीर सोडून गेलो तरी भक्तांसाठी धावून येईल 

– साई  बाबा म्हणतात मी जरी देह सोडून गेलो तरी जेव्हा जेव्हा माझा भक्त मला हाक मारेल तेव्हा मी धावून येईल. मी आपल्या भक्तास सर्व प्रकारे मदत करीन.

चौथे वचन : मनात अगाध श्रद्धा ठेवा

– माझ्या अनुपस्थितीमुळे भक्ताचा विश्वास कमकुवत होऊ शकतो. त्याला एकटेपणा आणि असहाय्य वाटू लागू शकते. परंतु मनापासून केलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होईल असा भक्ताचा विश्वास असावा.

पाचवे वचन : मी सदैव जिवंत आहे

साईबाबा म्हणतात की माझे फक्त शरीर नसेल पण मी अजरामर असा परमात्मा आहे.  म्हणून मी सदैव जिवंत राहील. कोणताही भक्त ही गोष्ट भक्ती आणि प्रेमाने पूजा केल्यास ही गोष्ट णाभाऊ शकतो.

सहाव वचन : माझ्या शरण मध्ये आलेला कधीही विन्मुख परतत नाही.

– जो खरी श्रद्धा घेऊन माझ्या आश्रयाला आला आहे. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे.

सातवे वचन ; ‘जशी भक्ताची भावना सेल तसाच मी दिसेल. 

– जो भक्त माझ्याकडे ज्या भावनेतून पाहतो तसाच त्याला जाणवेल. त्याची ज्या स्वरूपाची इच्छा असेल त्या स्वरूपातच मी ती पूर्ण करेल.

आठवे वचन : तुमचा भर सदैव माझ्यावर असेल 

– जो व्यक्ती पूर्णपणे मला समर्पित असेल त्याच्या आयुष्याचे सर्व भार मी स्वतः पेलवेन .  त्याच दायित्व मी करेल.

नववे वचन : मनापासून जे मागत ते नक्की मिळेल

– जे श्रद्धाळू मनात श्रद्धा ठेऊन मदत मागतात त्यांना मी नक्कीच मदत करीन.

दहावे वचन : ‘मुझमें लीन वचन मन काया , उसका ऋण न कभी चुकाया.’

– जो भक्त मन, वचन व कर्म याने माझ्यात लिन असतो  मी त्याचा नेहमी ऋणी असतो.  त्या भक्ताच्या आयुष्याची सर्व जबाबदारी माझी आहे.

अकरावे वचन ‘धन्य धन्य व भक्त अनन्य , मेरी शरण तज जिसे न अन्य.’

साई बाबा म्हणतात जे भक्त माझ्यात अनन्य भावाने लिन झालेले असतात ते खरोखर धान्य आहेत.   असे भक्त खरोखरच भक्त असतात.

या अकरा वचनांचा आपल्या जीवनात असा करावा अंगीकार 

 • – कोणत्याही गुरुवारी, लाल पेनाने पिवळ्या कागदावर हे वचन लिहा.
 • – हे वचन आपल्या प्रार्थनास्थळ, शयनकक्ष आणि काम करण्याच्या ठिकाणी ठेवा.
 • – पूजा करण्यापूर्वी, झोपायच्या आधी, काम करण्यापूर्वी आणि उठल्यानंतर हे वचन वाचा.
 • – हे वाचल्यानंतर साईबाबांचे स्मरण करा . तुम्हाला साईबाबांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button