Ahmednagar NewsBreaking

कोरोनामुळे होणाऱ्या उपासमारीला कंटाळून पुण्यात एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक आत्महत्या

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : पुणे: पुण्यातील सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 30) , ॠवेद अतुल शिंदे (वय आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर नगर, वाघजाईनगर लेन नंबर एक मध्ये हे दाम्पत्य राहत होते.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दोन दिवसांपासून त्यांच्या घरात कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून पाहिले असता, घरातील चौघेही सिलिंग फॅनच्या हुकला लटकलेक्या अवस्थेत आढळले. त्यांना खाली उतरून रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले.

प्राथमिक माहितीत या कुटुंबाचे प्रमुख अतुल शिंदे हे ओळखपत्रे बनवून देण्याचे काम करत होते. त्यावरच त्यांची उपजीविका चालायची. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक हलाखीमुळे कुटुंबाने जीवन संपवल्याचे भिंतीवर लिहले आहे. याचा पोलिस तपास करत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button