कौतुकास्पद! ‘या’ व्यापाऱ्याने कोरोनाग्रस्तांसाठी दिली 19 मजली इमारत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण भलतेच वाढत चालले आहे. राज्यात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. आता नवीन माहितीनुसार पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 दिवसात दुप्पट होत आहे.

अशा स्थितीत येथील स्थानिक व्यापारी मेहुल संघवी यांनी आपली 130 फ्लॅट असलेली नवीन इमारत मुंबई मनपाला अस्थायी कोरोना हॉस्पीटल बनवण्यासाठी दिली आहे.

पश्चिम उपनगरातील विशेषकर उत्तर मुंबईअंतर्गत मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्‌टी यांनी आपल्या क्षेत्रातील बिल्डरांना इमारती कोरोना सेंटरसाठी देण्याची अपील केली.

त्यांच्या अपीलवर मालाडचे व्यापारी मेहुल संघवी यांनी 19 मजली इमारत मनपाला दिली आहे. मालाडचे सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरेने सांगितले की या इमारतीमध्ये आता 500 रुग्णांचा उपचार सुरू झाला आहे.

प्रत्येक फ्लॅटमध्ये चार रुग्णांना ठेवण्यात आले आहे. ते म्हटले की, अशा परिस्थितीत आपली इमारत कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणे कौतुकास्पद आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment