Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली.

या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

पारनेरच्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन

सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब मारुती भोसले, सुनीता बाबासाहेब भोसले,

साळूबाई सुरेश भोसले, संदीप सुरेश भोसले, नंदिनी सुरेश भोसले, सुहास सुरेश भोसले, पूजा सुहास भोसले (सर्व भाळवणी) हे विनापरवाना मुंबईहून आले.

प्रशासनास कोणतीही कल्पना न देता भाळवणी येथील विलगीकरण कक्षात ते दाखल झाले. हा प्रकार १३ ते १५ जूनदरम्यान घडला.

भाळवणी येथे कोरोना संसर्ग झालेला दुसरा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले असून भोसले कुटुंबीय भाळवणीत दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button