Spacial

उद्या आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण : 500 वर्षांनंतर घडून येणार असे काही…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे.

सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण या वर्षातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असेल.

भारतात सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सूर्यग्रहण लागेल आणि दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा स्पर्श होण्यापूर्वी सुमारे 12 तास आधी वेधकाळ सुरू होतात.

अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. या सूर्यग्रहणादिनी अनेक योग तयार होत आहेत. एक म्हणजे याच दिवशी जागतिक योग दिवस, जागतिक पितृदिन आहे.

21 जूनचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. हे सूर्यग्रहण सर्वांत मोठे सूर्यग्रहण असणार आहे.

दरम्यान सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता. त्यानंतर आता तो सन २०२० मध्ये आला आहे. एका मतानुसार, हे सूर्यग्रहण मेष, सिंह, कन्या, मकर राशींना शुभफल देणारे;

वृषभ, तुळ, धनु, कुंभ राशींना मिश्रफल देणारे; तर, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन राशींना प्रतिकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

यंदाचे सूर्यग्रहण सकाळी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून होणार असून, त्याचे वेध आदल्यादिवशी रात्री म्हणजेच २० जून २०२० रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांपासून लागतील, असे सांगितले जाते.

ज्येष्ठ अमावास्येला लागणारे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण २६ डिसेंबर २०१९ प्रमाणे मोठे सूर्यग्रहण असेल, असे सांगितले जाते.

यापूर्वी २५ ऑक्टोबर १९९५ रोजी अशा प्रकारचे मोठे सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहणाचा मध्य सुरू झाला, तेव्हा एवढा अंधार झाला होता की, पशू-पक्षी सूर्यास्त झाल्याचा भास झाल्यामुळे आपापल्या घरट्यांमध्ये निघून गेले होते.

दुसरे म्हणजे यावर्षीच्या सूर्यग्रहणाचे विशेष म्हणजे देशाच्या काही भागातून हे ग्रहण खग्रास आणि काही भागातून कंकणाकृती प्रकाराचे दिसेल. त्याचप्रमाणे या शतकातील हे सर्वांत मोठे दुसरे सूर्यग्रहण ठरणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button