आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे.

कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय करत होते? भ्रष्टाचाराच्‍या फाईल काढु नयेत म्‍हणुन मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजप मध्‍ये घ्‍या म्‍हणुन विनवणी करत होते यावरही त्‍यांनी बोलले पाहीजे

असे आव्‍हान माजीमंत्री आ.विखे पाटील यांनी दिले. कॉंग्रेसचे प्रदेशअध्‍यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा आ.विखे पाटील यांनी जोरदार समाचार घेतला.

लोणी येथे माध्‍यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, प्रदेशअध्‍यक्षांच्‍या वक्‍तव्‍याला फारसे गांभिर्याने घ्‍यावे अशी परिस्थिती नाही. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात कॉंग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली हे महाराष्‍ट्र पाहतोय, त्‍यांचे स्‍वत:चे कर्तृत्‍व काहीच नाही.

यापुर्वी राज्‍यात अशी परिस्थिती कधीही नव्‍हती. सत्‍तेत सहभाग असलेल्‍या राष्‍ट्रीय पक्षाच्‍या प्रदेश अध्‍यक्षाला आठ आठ दिवस मुख्‍यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठे दुर्दैव असल्‍याकडे लक्ष वेधून येवढी लाचारी पत्‍करुन सत्‍तेत का राहाता?

सत्‍तेत आम्‍हाला स्‍थान राहुद्या यासाठीच आता मातोश्रीवर वा-या सुरु असल्‍याची टिका आ.विखे पाटील यांनी केली. राज्‍यात शेत‍करी, उद्योजक, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

या प्रश्‍नांसाठी मुख्‍यमंत्र्यांकडे गेले असते तर सर्वांना आनंद वाटला असता. पण सत्‍तेत आम्‍हाला ‘घाटा नको वाटा पाहीजे’ ही स्‍वार्थी भूमिका घेवूनच मातोश्रीवरच्‍या बैठकीचा त्‍यांचा फार्स होता हे आता लपून राहीलेले नाही.

मागील पाच वर्षे त्‍यांना सभागृहात बोलण्‍यासही वेळ नव्‍हता. त्‍यांच्‍या मंत्रीपदाच्‍या कार्यकाळातील कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. भ्रष्‍टाचाराच्‍या फाईल बाहेर येवू नयेत यासाठीच ते मागील युती सरकारच्‍या विरोधात शब्‍दही काढण्‍याची हिम्‍मत दाखवु शकले नसल्‍याचा थेट आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

कोणी कोणाचे पाय धरले या आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले की, मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन थोरात काय करत होते? भ्रष्‍टाचाराच्‍या फाईल बाहेर येवू नयेत म्‍हणून मुख्‍यमंत्र्यांचे पाय दाबत होते की भाजप प्रवेशाची बोलणी करत होते यावरही आ.थोरातांनी बोलले पाहीजे असा सल्‍ला आ.विखे पाटील यांनी दिला.

महसुल मंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्‍त आधिकारी पुन्‍हा थोरातांच्‍या कार्यालयात कसे दिसतात? त्‍यांनी स्‍वेच्‍छा निवृत्‍ती घेतली, मागील पाच वर्षे हे आधिकारी घरी बसले होते.

vikheआता पुन्‍हा मंत्री झाल्‍यानंतर हेच आधिकारी थोरातांच्‍या कार्यालयात मागे बसुन काय करतात, प्रशासनात चांगले आधिकारी नाहीत का? स्‍वेच्‍छा निवृत्‍ती घेतलेल्‍या आधिका-यांना पुन्‍हा घेण्‍याचे गौडबंगाल काय, हे एकदा राज्‍यातील जनतेला कळु द्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment