मंदिरातील चोरीचा उलगडा… एका अल्पवयीन आरोपीसह ३ जणांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील गावचे ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरात रविवारी (दि.१४)  खंडोबा मंदिरातून अज्ञात चोरटयांनी मंदिरातील १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती.

त्या चोरीचा उलगडा झाला असून पोलिसांनी  एका अल्पवयीन आरोपीसह  तीन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुन्ह्याचे तपस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाची नेमणूक केली होती.

त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करत आरोपीना अटक केले. चोरटयांनी मंदिरातील तिजोरीत ठेवलेले १ लक्ष ७० हजार रुपये  किंमतीचे चांदीचे व पितळी पंचधातुचे खंडोबा देवाचे मुखवटे , चांदीचे लहान मोठे ६ घोडे , सोन्याचा बदाम , सोन्याचे दोन मनी मंगळसुत्र असा मुद्देमाल चोरून नेला होता.

पोलिसांनी  देऊळगाव सिद्धी येथील हर्षा काळे व त्याचे साथीदारांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी देऊळगाव येथील डोंगरात लपून बसलेल्या हर्षा काळे याला ताब्यात घेतले.

त्याने हा गुन्हा देलवडी येथील संतोष ऊर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९), श्रीखंड्या जिवलाल चव्हाण (वय .३५ रा. केडगाव) व एका अल्पवयीन साथीदाराच्या सहाय्याने केल्याचे कबूल केले.

सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद माने,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील , पो.हे.कॉ. अंकुश ढवळे,दत्तात्रय हिंगडे,

विजयकुमार बेठेकर , पो.ना संदिप पवार , संदिप पोपट पवार , भागिनाथ पंचमुख , राजेंद्र कर्डीले , पो.का विनोद मासाळकर , योगेश सातपुते , सुरज वाबळे , मेघराज कोल्हे , पो.ना दिपक शिंदे , रविकिरण सोनटक्के, बाळासाहेब भोपळे आदींनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment