Ahmednagar NewsBreakingCrime

श्रीगोंदयात प्रियसीच्या पतीचा पत्नी व प्रियकरावर चाकू हल्ला दोघेही बालनबाल बचावले

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : आपली पत्नी त्याच्या प्रियकरासोबत राहते, या रागातून पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने चाकूहल्ला केल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता शहरातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घडली आहे .

सदर घटनेबाबत प्रियकराने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियसीच्या पतीविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रियसी ही श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील आहे ती आजारी असल्यामुळे शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती.

तिच्याजवळ थांबण्यासाठी कुणी नसल्यामुळे तिचा प्रियकर हा दि.१९जून पासून तिच्याजवळ सदर हॉस्पिटल मध्ये थांबला होता आज दि२१रोजी सकाळी साडेदहा वाजता सदर प्रियसीचा पती हा ती ऍडमिट असलेल्या हॉस्पिटल मध्ये आला, त्याने तिथं जाऊन स्वतःची पत्नी व तिच्याजवळ थांबलेला पत्नीचा प्रियकर या दोघांना त्यांच्या प्रेमप्रकरणावरून वाईट शिवीगाळ केली आणि स्वतःच्या खिशातील भाजी कापण्याचा चाकू काढून पत्नीच्या प्रियकरावर हल्ला चढवला.

प्रियकराने हाताने चाकू अडवल्यामुळे त्याच्या हाताला जखम झाली परंतु प्रियसीच्या नवऱ्याने चाकू हिसकावून प्रियकराच्या मानेवर चाकूने वार केला त्यात प्रियकर गंभीर जखमी झाला. सदर वाद सोडवण्यासाठी प्रियसी मध्ये पडली असता आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच तीला चाकू मारण्याचा प्रयत्न केला, तिच्या हाताच्या बोटाला चाकू लागून प्रियसीला देखील दुखापत झाली.

अचानक हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. हॉस्पिटल मधील कर्मच्याऱ्यांनी चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला हॉस्पिटलच्या बाहेर हाकलून दिले, त्यानंतर हे दोघे प्रेमी युगुलाने थेट श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button