Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

घाटामध्ये साखरेचा ट्रक पलटला, ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्याने जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :   जामखेड तालुक्यातील सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेडकडे येत असलेला ट्रक वळणावर पलटी होऊन ट्रक चालक लायक शब्बीर पठाण (वय 43, जिल्हा बीड) हा जागीच ठार झाला आहे.

या अपघातात अशोक तोरडमल (वय 24 रा. मामदापुर ता.अंबाजोगाई जि. बीड) हा जखमी झाला आहे. अंबाजोगाई येथील रेणापूर शुगर कारखाना येथुन एम. एच. 44 – 8955 ट्रक साखर भरून पनवेल येथे टेककेअर एअर हाऊसला साखर घेऊन चालला होता.

जामखेड पासून जवळ असलेल्या सौताडा घाटामध्ये रोडचा अंदाज न आल्याने गाडी घाटात दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाली यावेळी गाडीच्या किन्नर साईडला पडल्यामुळे तो वाचला आणि ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांचे बंधू सुनील कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले असता जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील

आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना घटनेची माहिती दिली त्या आडकलेल्या संबंधिताच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे आणि यांच्या सहकार्याचे मदतीने मृतदेह ट्रकच्या आतील काही पार्ट तोडून बाहेर काढण्यात आला आहे .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मृतदेह कोठारी यांनी जामखेड येथील सरकारी दवाखान्यात आणून दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button