Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

कीर्तनकारांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू …अंत्यविधीला येऊ न शकल्याने मुलीचा ऑनलाईन आक्रोश,उपस्थितांनाही कोसळले रडू

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात किर्तनकार ह.भ.प. पोपट महाराज महाडीक यांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला.

पोपट महाराज महाडीक ( वय ७० वर्ष ) हे रविवारी ( दि. २१ ) पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेतात भूईुमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करण्यासाठी विहीरीवर गेले होते.

परंतू विहीरीजवळ त्यांना विजेचा धक्का बसला व बेशुद्ध पडले. त्यानंतर बऱ्याच वेळाने त्यांचा पुतण्या तेथे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिरूर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. महाडीक महाराजांनी गेल्या चाळीस वषार्पासून वारकरी संप्रदायाची सेवा करताना गावोगावी जाऊन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली होती.

परिस्थिती गरिबीची असली तरी मुलगा व मुलींना उच्च शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

अत्यंत शांत व मनामिळाऊ स्वभावाचे असणारे महाडीक यांच्या दुदैर्वी निधनाची बातमी श्रीगोंदयासह शिरुर व पारनेर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यााने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या अंत्यविधीला परीसरातील वारकरी सांप्रदायातील भाविकांंसह माजी आमदार राहूल जगताप उपस्थित होते.

मोठी मुलगी नलीनी सध्या अमेरीकेत नोकरीला असल्याने वडीलांच्या अंत्यविधीला येऊ शकली नाही मात्र तिला मोबाईलहून ऑनलाईन अंत्यदर्शन देताना उपस्थितांनाही रडू कोसळले.

२१ जून जागतिक फादर्स डे म्हणजे वडीलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिवशीच आपले पितृछत्र हरपल्याने तिने केलेला ऑनलाईन आक्रोश उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेऊन गेला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button