‘या’आजाराने जगाला बदलायला भाग पाडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :आरोग्य हीच खरी संपत्ती व श्रेष्ठ धन आहे. हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला मोठा संदेश आहे. परंतु, माणूस हा माणसांपासून दूर जाऊन जाती-धर्मात अडकला व संपत्ती वाढविण्याच्या नादात माणुसकीही विसरला.

संपत्तीच्या मागे धावणाऱ्या माणसा आता तरी माणुसकीने वाग असा धडा कोरोनाने सक्तीचे लॉकडाऊन करून शिकवला आहे. चीनच्या बुहान शहरातून आलेल्या या विषाणूने जगात तीन लाखाहून अधिक बळी घेतले.

कित्येक लाख लोक संक्रमित झालेत. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, भारत, इराण इ. अनेक प्रगत राष्ट्र या विषाणच्या विळख्यात अडकले. जवळ अनेक अद्ययावत आरोग्य सुविधा असतांना देखील या न दिसणाऱ्या विषाणू विरोधात लढण्यास असमर्थ झाले आहेत.

ते सर्व हे संकट निवारण्यासाठी परमेश्‍वराजवळ याचना करीत आहेत. आपलीच स्वतःची माणसे ते वाचवू शकले नाहीत. कदाचित यावर पुढे औषध सुद्धा निघेल पण तोपर्यंत आपण खूप काही गमावून बसलो असणार.

प्रगतीच्या नावाखाली मानवाला काय ब कशाची आवश्यकता आहे? हे ह्या महामारीने नक्कीच विचार करायला लावले आहे, किंबहूना खूप काही शिकविले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment