Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट! आणखी १० नवीन रुग्णांची भर…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे,एकाच दिवसात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे.

नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. 

आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि बावीस वर्षे युवक यांचा समावेश आहे

याशिवाय नगर शहरातीलच सिद्धार्थ नगर भागातील आठ वर्षाची मुलगी, ३२ वर्षीय युवक, तीस वर्षीय महिला, २५ वर्षीय युवक यांचा अहवाल पॉझिटिव आला

तसेच नालेगाव येथील वाघ गल्ली येथील बावीस वर्षीय युवकही बाधित आढळून आला आहे. हे सर्वजण यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

याशिवाय जामखेड तालुक्यातील जवळे येथील ३० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून आली होती.

तसेच संगमनेर शहरातील ५५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव आढळून आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस आता ४८ इतक्या झाल्या आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button