शिर्डी ब्रेकिंग : स्वत:च्या दुकानात गळफास घेत व्यावसायिकाची आत्महत्या 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात संध्याकाळी 5 वाजता श्रीराम चुटके (55) या व्यापाऱ्याने आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि नगर – मनमाड महामार्गावर हॉटेल सिद्धांतजवळ  श्रीराम चुटके यांचे जनरल स्टोअर्स आणि कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे.

याच दुकानातील फॅनला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्राथमिक तपास करत असून पोलीस तपासानंतर या व्यावसायिकाच्या आत्महत्येचे खरे कारण पुढे येणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment