फेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परंतु त्यानंतर अनेक व्यवसाय ठप्प झाले. यात सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाल्याने आर्थिक चक्र बिघडले. आता लॉक डाऊन शिथिल केले असले तरी सलून व्यावसायिकांना पररावानागी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे आता रुतलेल्या अर्थचक्रातून बाहेर पडण्यासाठी सलून व्यावसायिकांनी दरवाढ करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नव्या दरानुसार फेशियलसाठी आता पाचशे तर कटिंग 100 आणि दाढीसाठी 60 रुपये मोजावे लागणार आहे.

वाढती महागाई आणि कुटुंबाची गुजराण करताना सलून व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सलून असोशिएशनची बैठक झाली. त्यात दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, कटिंग साधी-१०० रु., फॅशनेबल-१५० रु., कटलाईन-८० रु., मसाज -१५० रु., हेअर कलर-१०० रु., दाढी साधी-६० रु. , दाढी ट्रिमिंग -१०० रु. , साधे ब्लीच-५०० रु., फेस मसाज-१२० रु. , फेशिअल-५०० रु. असे दर स्वीकारण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment