HealthLifestyle

जखमा भरण्यापासून पोटातील गॅसेस कमी होईपर्यंत… जाणून घ्या झेंडूचे औषधी गुण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार असतात.

झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो. डोके दुखत असेल, दात दुखत असतील किंवा इतर आजर असतील त्यासाठी झेंडू हे फायदेशीर असते. आज आपण जाणून घेऊ या फुलांच्या अजून काही औषधी गुणांविषयी माहिती…

झेंडूचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे जळणे, आणि पुरळ सारख्या आजारांना बरे करते. हा त्वचेच्या बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये वापरला जातो.

झेंडूची पेस्ट त्वचेवर लावल्यास सूज, लालसरपणा आणि कोरडेपणाचा त्रास दूर होतो. झेंडू शरीर स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. हे सर्व विषारी घटक काढून शरीर स्वच्छ करते

जखमा भरण्यासाठी, किड्या-मुंग्यांचे चावण्यावर या फुलाच्या पाकळ्याच्या पावडरचा समावेश असलेले अॅण्टीरिपेलन्ट वापरले जातात. या फुलांच्या फ्लेवरमध्ये अगदी जास्त किंमतीच्या चहापासून ते ग्रीन टी पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहे.

या चहाच्या सेवनाने प्यायल्यास पोटातील गॅसेसचा, पोटात अचानक कळ येण्याचा त्रास कमी होतो. पाय, डोळे, तोंड, त्वचेवरील जंतूवर या फुलाची पावडर वापरून बनवलेली औषधे म्हणजे रामबाण उपाय आहे.

निराश होणं किंवा भीती वाटणं, वेगवेगळ्या गोष्टीची सतत भीती वाटत राहणं, पुढे काय होणार याची अनामिक भीती यावर झेंडूच्या फुलांच्या रसाचा वापर केला जातो.

सर्व प्रकारच्या जखमांवर झेंडूच्या फुलाच्या रसाचा उपयोग होतो. जखम झाल्यानंतर त्या जागी नवीन त्वचा उत्पन्न करण्याची क्रिया झेंडूच्या रसामुळे लवकर होते. त्यामुळे निरोगी त्वचा येते.

जखमेमुळे गँगरीन होणार असं वाटलं तर ते झेंडूचा रस थांबवतं. झेंडूच्या रसामुळे कोणत्याही जखमेतून विषबाधा होत नाही.

रक्ताच्या कर्करोगासारख्या विकारातही पोटात हा रस घेतला तर चांगला गुण येतो. किलॉईड नावाच्या विकारातही या औषधामुळे खूप फरक पडतो.

भाजलेल्या जखमांवर ‘कॅलेंडय़ुला’ औषधाने फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे या औषधामुळे जखमेतून विषबाधा होत नाही आणि भाजलेली जखम लवकर नाहीशी होते. त्याचे व्रणही शिल्लक उरत नाहीत.

झेंडूचा चहाही असतो गुणकारी !

झेंडूची फुले वाळवून त्यांचा वापर चहासाठी करता येतो. चहा उकळण्यापूर्वी त्यात झेंडूच्या फुलांच्या सुकवलेल्या पाकळ्या मिसळतात. हा चहा आतडय़ांची जळजळ, पोटातील कृमी, कावीळ, डायरिया, यकृताचे विकार यासाठी उपयोगी आहे.

झेंडूच्या फुलांसोबत गाजर, सफरचंद व मध मिसळून त्यांचा रस काढून घेतला तरीही फायदा होतो. हा चविष्ट रस वजन कमी करणे, चामखीळ व खरूज अशा आजारांवर हमखास फायदेशीर ठरतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button