अहमदनगर झाले थ्री स्टार; मिळणार २५ कोटींचा निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे.

यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये व कचरा कुंडली मुक्त शहर अशी नवी ओळख नगर शहराने मिळवली आहे.

या नव्या ओळखीमुळे नगर शहराच्या पदरात केंद्राकडून 15 ते 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणे निश्‍चित झाले आहे. अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाल्याची बातमी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सकाळीच दूरध्वनी करून महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिली.

तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही द्विवेदी यांनी दुरध्वनी करून अभिनंदन केले. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि स्वच्छता, आरोग्य यासाठी मनापासून काम केले. त्यासाठी सर्वांनी योगदान दिले. जागृती केली.

त्यामुळे अहमदनगरला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाला. यामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळणार आहे. हा निधी शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच शहर कचरामुक्त करण्यासाठी उपयोगात आणू अशी प्रतिक्रिया महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेला गती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. याबरोबरच सर्वच सदस्य , नगरसेवक , अधिकारी , पदाधिकारी आदींचे यात मोलाचे सहकार्य आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment