Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :   इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्‍या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे.

 

शहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.

    शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, पक्षाचे शहर सरचिटणीस अभिजित कांबळे आदिंनी सुरक्षित अंतर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने केली.

यावेळी प्रांतिक सदस्य शामराव वाघस्कर, शहर चिटणीस मुकुंद लखापती, महिला काँग्रेसच्या सौ.अलका बोरुडे, सरचिटणीस सुभाष रणदिवे, भिंगार काँग्रेस सचिव निजाम पठाण आदि उपस्थित होते.

     कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नोकरी-व्यवसायावरील परिणामाने खर तर जनता त्रस्त असतांना इंधनाच्या वाढत्या किंमतीचा बोजा जनता जनार्धन कसा पेलणार? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

डिझेलच्या किंमती पूर्वी पेट्रोल दरापेक्षा कमी होत्या, त्या आता अधिक महाग असल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती ही वाढणार म्हणजे सर्वत्र महागाई होणार यातून जनतेला दिलासा कसा मिळणार अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

     पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या 15 दिवसात 10 रुपयांची वाढ झाली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. मंगळवारी सलग 17 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 20 पैशांनी तर डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे पेट्रोलचे दर आता 80 रुपयांवर पोहचले आहे. रु. 79.76 रुपये, पेट्रोल तर 78.40 रुपये डिझेलचे नवे दर आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात भाजप सरकारला कायम अपयश आले आहे, तसा आरोप यावेळी करण्यात आला.

नजिकच्या काळात इंधनाचे दर कमी करुन ते स्थीर न ठेवल्यास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button