पडळकरांनी आपली लायकी काय, आपण बोलतोय काय? याचे भान ठेवले पाहिजे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून

अहमदनगर जिल्ह्यात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे फासू असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले आहे.

भाजपच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन गोपीचंद पडळकरांच्या वाचाळ वक्तव्याचा माध्यमातून झालेले दिसते. नुकतीच भाजपने त्याना विधानपरिषदेवर संधी दिली

तिथे चांगले काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संस्कृतीप्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहात.

देशाचे नेते व महाराष्ट्राचे सर्वेसर्वा आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांवर आक्षेपार्ह विधान केले आहे, स्वतःचे कुठलेही कर्तुत्व नसलेल्या गोपीचंद पडळकर याने सूर्यावर थुंकल्यास तोच थुंकी स्वत: पडल्यासारखी आहे.

पडळकरांनी आपण कोणावर बोलतोय, आपली लायकी काय, आपण बोलतोय काय? आपले वय काय याचे भान ठेवले पाहिजेे. स्वत: त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे तपासणी करुन घ्यावी कारण त्यांचा मानसिक तोल ढासळलेला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment