Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCorona Virus Marathi News

‘या’ तालुक्यात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण आणि झाले कोरोनाचे शतक…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. काल दोन महिला व एक पुरुष असे तीन व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले.

संगमनेर शहरातील नायकवाडपुऱ्यातील महिला व मोमिनपुरा येथील पुरुष व तालुक्यातील कुरण येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी प्रशासनाने दिली.

बाधितांचा आकडा आता १०० झाला आहे.त्यामध्ये 84 तालुक्यातील व 15 बाहेरील असून सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

शहरातील नायकवाडपुरा येथील ५० वर्षीय महिला, मोमिनपुरा येथील ४६ वर्षीय पुरुष व तालुक्यातील कुरण येथील ८५ वर्षीय महिलेला कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

शहरातील दोघे बाधित कंटेन्मेंट झोनमधील आहेत. नायकवाडपुरा, मोमिनपुरा व कुरण येथील बाधित रहिवासातील क्षेत्र प्रशासनाने सील केले असून बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button