Ahmednagar NewsCorona Virus Marathi NewsMaharashtraSpacial

१०२ वर्षांच्या पायी वारीत खंड, प्रथमच चारचाकीतून पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  वारकरी साप्रंदायातील थोर उपासक राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न श्रीसंत भगवानबाबा यांनी श्रीक्षेत्र भगवान गडाच्या स्थापनेपूर्वी श्रीक्षेत्र नारायण गडाहून सन १९१८ मध्ये सुरू केलेल्या पायी पढंरपूर दिंडी सोहळ्याला यावर्षी कोरोनामुळे १०२ वर्षांनंतर खंड पडला आहे.

संत भगवानबाबा यांच्या पादुकांचे आषाढी एकादशीनिमित्त चारचाकी वाहनातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यंदाच्या प्रस्थान सोहळ्यासाठी पाश्चात्य भाविकांची उपस्थिती लक्ष्यवेधी ठरली.

संत भगवानबाबांची समाधी व विजयी पांडुरंगाची पूजा करून नगर प्रदक्षिणा होऊन पादुकाचे प्रस्थान झाले. यावेळी विदेशी भाविकांसह भगवानगडाचे विश्वस्त ज्ञानेश्वरी विद्यापीठातील विद्यार्थी व ठरावीक भाविक उपस्थित होते.

श्रीक्षेत्र भगवानगड ते पंढरपूर आषाढी महावारी पायी दिंडी सोहळा श्रीसंत भगवानबाबांनी पायी वारी सुरू केली होती. संत भगवानबाबांनी श्रीक्षेत्र भगवानगडाच्या स्थापनेपूर्वी श्रीक्षेत्र नारायणगडाहून सन १९१८ मध्ये पायी पढंरपूर दिंडी सुरू केली होती.

भगवानगडाची नाथ ही गुरू परंपरा असल्याने पंढरपूरमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळयाचा प्रवेश होण्यापूर्वी आपल्या गुरू परंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान भगवानगडाच्या पालखीला आहे.

भगवानगडाची पालखी आल्याशिवाय संत एकनाथांची पालखी पढंरपूरमध्ये प्रवेश करत नाही. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. मात्र, या वर्षी कोरोना महामारीने देशभरात कहर माजवला.

पर्यायाने सर्वच मोठ मोठ्या कार्यक्रमावर निर्बंध लादले गेले. त्यात धार्मिक कार्यक्रमाचा सुध्दा समावेश आहे. लाखोंचा भक्त समुदाय सोबत घेऊन शेकडो वर्षांपासून ‘ज्ञानोबा तुकोबा’ सह अन्य संतांच्या चालणाऱ्या सोहळ्यावर बंधने आली.

मानाच्या पालख्या मोजक्याच भाविकांना घेऊन वारीचा सोहळा साजरा करणार आहे. त्यामुळे भगवानबाबा यांच्या पादुकांचे प्रस्थान भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या आदेशाने

ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नारायण स्वामी यांनी पादुका घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान केले. हजारो भाविकांचा लवाजमा घेऊन चालणारा भगवानगडाचा हा पालखी दिंडी सोहळा यावर्षी मोजक्याच भाविकांसह पादुका घेऊन रवाना झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button