अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पंधरा रुग्ण वाढले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे.यात नगर शहरातील ०६ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ०८ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात आज वाढले १५ नवे रुग्ण , आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 397 झाली आहे

अहमदनगर जिल्ह्यात आज ८ कोरोनग्रस्तआजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७३ झाली आहे. तर, आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने १५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ही १११ झाली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात ६ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नालेगाव ३, आडते बाजार १, तारकपूर १ आणि तोफखाना १ असे रुग्ण आढळले आहेत.

यातील तारकपुर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. याशिवाय, श्रीगोंदा तालुका ०३, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी ०१ आणि राहाता तालुक्यात ०२ कोरोना बाधित आढळले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment