या तालुक्यात सलग चौथ्या दिवशी आढळला कोरोना रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीरामपूर शहरात काल सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११ झाली आहे. गोंधवणी परिसरातील बाधीत महिलेच्या मुलाचा कोरोना अहवाल काल पाॅझिटीव्ह आला.

कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरु केले आहे. गोंधवणी येथे तीन दिवसांपूर्वी ५५ वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

काल तिचा मुलगा (वय ३२) कोरोना बाधित असल्याचे तपासणीत आढळून आले. त्याच्या संपर्कातील सहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाबाधीत तरुण व्यवसायानिमित्त औरंगाबाद येथे रहातो. मात्र दोन महिन्यापूर्वी तो गोंधवणी येथे आला आहे. दरम्यान तो औरंगाबादला जाऊन आला असावा, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

मात्र त्याने आपण औरंगाबादला गेलोच नाही, असे सांगितले. गोंधवणी परिसरात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. तिघांनाही कोरोना नेमका कुठे झाला हे मात्र समजू शकले नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment