Ahmednagar NewsCrime

नगर जिह्यातील या चेकपोस्टवर अवैध दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लॉकडाऊनमुळे बाहेरच्या जिह्यातून येणाऱ्या नागरीकांची ठीकठिकाणी तपासणी केली जाते .या दरम्यान अनेक बाबी समोर येत आहेत.

असाच प्रकार अकोले तालुक्यातील बारी येथील चेक पोस्टवर घडला. यात राजूर पोलिसांनी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

असून या प्रकरणी राहुल गोपाळ मोहोड ( वय ४०, शेंडी ता. अकोले) यास अटक केली. अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील बारी येथे उभारण्यात आलेल्या

तपासणी नाक्यावर नाशिक जिल्ह्यातून आलेल्या एका कारची ( एम.एच.१७, बी.एस. ५००४) तपासणी करण्यात आली. कारमध्ये विदेशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. एकूण ७२० बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक गाडे यांनी फिर्याद दाखल केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close