बाधित महिलेच्या मुलालाही कोरोनाची लागण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   श्रीरामपूर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली असता तिच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या सहवासात आलेल्या लोकानाही तपासणीसाठी पाठवण्यात आले

असून श्रीरामपुरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या नऊवर पोहोचली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. निपाणी वडगाव येथील एका ३८ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल २३ रोजी पॉझिटिव्ह आला होता.

लगेच दुसऱ्या दिवशी श्रीरामपुरातील गोंधवणी येथील ५८ वर्षीय महिला व महांकाळ वाडगाव येथील एक ७५ वर्षीय महिला यांचे रेपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता १८ अहवाल निगेटिव्ह आले असून

८ अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.त्यापैकी गोंधवणी रोडवरील कोरोना बाधित महिलेच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील आठ जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment