अहमदनगर जिल्ह्यातील या कोरोना चाचणी लॅबला परवानगी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास इंडियन कउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व एम्सने कोरोना तपासणी लॅबला परवानगी दिली आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शंबरी गाठली असून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास करोना तपासणी लॅब सुरु झाल्यास वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

ट्रनॅट मशीन व आरटीपीसीआर तंत्रज्ञानाद्वारे संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट दोन तासात उपलब्ध होणार आहे. दोन तासाला चार कोरोना टेस्ट केल्या जाणार आहे.

सोमवार (२९ जुन) पासून लॅब सुरु होणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment