विखे – कर्डिले वाद खा. सुजय विखे म्हणतात…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : एकीकडे बंद पडलेला, अवसायानात निघू शकणारा शेतकर्‍यांचा मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी धडपडणार्‍या माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ दिल्यासारखे आहे.

त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारवाईला विखे- कर्डिले वादाचे स्वरूप देऊ नये. सभासद व कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डिले दोघेही कटिबद्ध असल्याचे खा. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

तनपुरे कारखान्यास थकबाकी प्रकरणी नगर जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस देण्यात अली असून, या पार्श्वभूमीवर खा. सुजय विखे बोलत होते. ते म्हणाले की,

तालुक्याची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास थकबाकी प्रकरणी नगर जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस मिळाली आहे.

ही नोटीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे अपेक्षित आहे. मात्र, या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप काही लोकांनी दिल्यामुळे सहकारात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपीरत परिणाम होत आहे.

तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळाच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि सहकारात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची खिल्ली उडवल्यासारखे आहे.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची ही अवस्था एका दिवसांत झाली का? असा सवाल करून एकेकाळी कारखान्याची गणना अतिशय संपन्न अशा संस्थांमध्ये होत होती.

आजची दुरावस्था, थकीत कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री, इतर पूरक प्रकल्प बंद पडणे हे सर्व कोणाच्या काळात झाले याचा विसर सभासदांना पडलेला नाही. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून नंतर स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला,

मात्र त्यांना कोणी जाब विचारायला तयार नाही. शेतकरी, सभासद आणि कामगार हित लक्षात घेऊन परिवर्तन मंडळाने सत्तेवर येताच थकित एफआरपी दिली, कामगारांचे अंशतः देणी दिली आणि दोन वर्ष यशस्वीपणे गळीत हंगाम पूर्ण केला.

दुष्काळामुळे व उसाच्या अनुपलब्धतेमुळे कारखाना सुरू करता आला नाही. जिल्हा सहकारी बँकेला हप्ते न देता आल्यामुळे आरबीआयच्या निकषाप्रमाणे थकबाकीसाठी बँकेने कारखान्यास नोटीस दिली.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखाना सुरू होऊ शकला, याबद्दल कुणालाच शंका नसावी. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment