Ahmednagar NewsPolitics

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा ! – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे.

राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे,

असा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला.

पुण्यातील अलका टॉकीज चौकात झालेल्या धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले,

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत १२५ डॉलरवर असतानाही देशांतर्गत इंधनाचे भाव स्थिर ठेवण्यात

त्यांनी यश मिळवले परंतु सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे, हा लोकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे. अगोदरच महागाईने गोरगरिब, सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे, मध्यवर्गीयांचे देखील कंबरडे मोडले आहे.

छोटे व्यावसायीकही इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. ही अन्यायी, जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी थोरात यांनी केली.

पुण्यातील आंदोलनात थोरात यांच्यासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी,

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते उल्हासदादा पवार, माजी आ. दिप्ती चौधरी, अभय छाजेड, कमलताई व्यवहारे, गोपाळ तिवारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button