परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवा.

उलट परीक्षा रद्द झाल्या मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या मात्र परीक्षा शुल्क मात्र विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजना याबाबतचे आदेश निर्गमित केले

असून कॉलेजने जमा केलेली फी विद्यापीठाकडे जमा करावी असे निर्देश दिले आहेत. सरकारकडून विद्यार्थ्यांची छळवणूक सुरु आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे उघड करत

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जर परीक्षा रद्द झाल्या तर परीक्षांची फी विद्यार्थ्यांकडून का घेताय ?

उलट प्रवेशाच्या वेळी ही परीक्षा फी जर कॉलेजने घेतली असेल तर ती आता विद्यार्थ्यांना परत करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनूसार तेलाचे भाव आपल्या देशातील तेलाचे भाव ठरवण्याचा निर्णय मागील काँग्रेस सरकारच्या काळात झाला.

त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव जसे वाढतात तसे आपल्या देशातील भाव वाढत आहेत. ही बाब आम्ही नम्रपणे जनतेपर्यंत पोहोचत आहोत.

काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे आता काँग्रेसला या भाव वाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ते केवळ राजकारण करीत आहेत.

जर त्यांना जनतेची एवढीच काळजी असेल तर मग महाराष्ट्र मध्ये पेट्रोल डिझेलवर आकारलेला कर त्यांनी माफ करावा. त्यांनी कर लावल्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment