Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

लग्न पडलं महागात : नवरदेव नवरीच्या आई वडिलांसह सभागृह देणाऱ्यांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शासनाने विवाहासाठी ५० लोकांना नियम पाळून परवानगी दिली असली तरी तालुक्यातील अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न होत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक सभागृहात लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवून जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह नवरदेव व नवरीच्या आईवडिलांवर बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

बेलापूर खूर्द येथील पोलीस पाटील युवराज गोरक्षनाथ जोशी यांनी बेलापूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल दिली. त्यात म्हटले की मी व सरपंच अनुराधा गाढे,

ग्रामसेवक चंद्रकांत तुंभारे, तलाठी विकास शिंदे, अनिल गाढे, सुनील बारहाते,उमेश बारहाते आदींची ग्रामस्तरावर कोरोना समिती आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता श्रीहरिहर केशव गोविंद बन ट्रस्टच्या सभागृहात विवाह सुरू होता.

या समारंभात कुठल्याही नियमांचे पालन न करता शेकडो लोक एकत्र आल्याचे समजले. कोरोना समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी जाऊन समक्ष पहाणी केली असता या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली.

केशव गोविंद बन ट्रस्टचे पदाधिकारी यांनी लग्न समारंभास परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. तसेच लग्न समारंभाच्या वेळी ट्रस्टचे कुणीही पदाधीकारी उपस्थित नव्हते.

गळनिंब येथील वधू व सडे तालुका राहुरी येथील वर यांचा विवाह पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या बाबत समितीने विचारणा केली असता काहींनी आम्ही पैसे मोजले असल्याचे सांगितले.

या लग्न समारंभासाठी १०० ते १५० पेक्षा जास्त लोक एकत्र जमवुन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडील कोरोना (१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे

अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पत्रक / आदेश क्रDC/कार्या/९ब१/२०२०दिनांक ३१मे २०२० अन्वये तसेच क्रआव्यमपू/कार्या१९अ/५९२/२०२०अहमदनगर दिनांक २जुन २०२० यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button