अहमदनगर ब्रेकिंग : त्या डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोपरगाव शहरातील दोन, तर टाकळी येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला. खडकी रोड येथील ४५ वर्षीय डॉक्टर व डॉक्टरांच्या ७२ वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

हे दोघेही नाशिक येथे जाऊन आले होते. टाकळी येथे सासरी आलेल्या मुंबईत वास्तव्य असलेल्या ४६ वर्षीय जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी शहर व सुरेगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्या दोघांची प्रकृती स्थिर असताना पुन्हा रुग्ण सापडल्याने संबंधित परिसर सील करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment