ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध मोफत

0

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे.

Advertisement

या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल व खर्च भागवून उर्वरित रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

यासंबंधीचा विभागाचा शासन निर्णय व आरोग्य मंत्रालय यांचे शासन निर्णय जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम औषध चांगली कामगिरी करते असे आयुष मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे.

Advertisement

त्यामुळे हे औषधेखरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक सर्व विभागांच्या अखर्चित निधीची माहिती घेण्याचे काम सुरू केले होते.

ग्रामविकास विभागाने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याज या निधीमधून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील 5 कोटी लोकांना वितरणासाठी विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीची निविदा काढली होती.

Advertisement

परंतु, ज्या दरामध्ये औषधे मिळणे आवश्यक होते तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li