EducationalMaharashtra

थोडंस मनातलं : धार्मिक स्थळे , शाळा आणि काॅलेज अजुनही बंदच पण दारू व्यवसाय सुरू ….

Best Sellers in Electronics

नमस्कार मित्रांनो, आज पासुन अनलाॅकडाऊन भाग 2 सुरू होतो आहे. सध्या अहमदनगर जिल्हा नाॅन रेड झोन आहे. महाराष्ट्रा बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या दररोज वाढतच आहे. दोन तीन दिवसात जास्त प्रमाणात कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. परंतु कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. तसेच पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी सुद्धा नियमाचे काटेकोर पालन करण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत.

त्यामुळे कोरोना बाधीत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. महाराष्ट्र सरकारने व जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कालच अनलाॅकडाऊन भाग 2 जाहीर केला आहे. यामध्ये लाॅकडाऊन 31जुलै 2020 पर्यंत वाढवला असुन रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. अनलाॅकडाऊन भाग 2 मध्ये अनेक शिथिलता आणली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन व बफर झोन वगळता सर्व अनेक भागात बरेचसे उद्योग व्यवसाय आणि छोटे मोठे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

असे असले तरीही महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा आणि काॅलेज बंदच ठेवले आहेत, परंतु दारूची दुकाने उघण्यास काही अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. वास्तविक पाहता लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात सुद्धा अनेकदा बेकायदेशीर पणे दारू विकली जातच होती. उलट जोपर्यंत दारू दुकान उघडी करण्याची परवानगी नव्हती तोपर्यंत जास्त दराने आणि जास्त प्रमाणात दारू विकली गेली. तसेच काही बनावट दारू प्रकरण सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात घडले आहे.

तशा स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. अर्थात जे लायसेन्स धारक किरकोळ व ठोक  दारू विक्रेते आहेत त्यांचे नुकसान सुद्धा झाले आहे.दारू विक्रीतून सरकारला जास्त प्रमाणात टॅक्स मिळतो म्हणून परवानगी दिली असेल असे वाटते. परंतु महाराष्ट्रातील सर्व देवदेवता कवाडाच्या आड बंदच आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आषाढी एकादशी ला सुद्धा काही पालखी व वारकरी जनतेला पंढरपूरला जाण्याची परवानगी नाकारली आहे.

वास्तविक पाहता ज्या भागात कोरोना बाधीत रूग्ण नाहीत किंवा कोरोनाचा प्रसार नाही अशा भागातील धार्मिक स्थळे आणि शाळा व काॅलेज काही अटी शर्तीवर उघण्यास परवानगी दिली असती तर बरे झाले असते. परंतु शेवटी प्रशासनाने काहीतरी खबरदारी घेऊनच निर्णय घेतले असावेत. सध्या अहमदनगर शहरात कोरोना घुसलाय आहे.शहरातील मध्यभाग, भिंगार, केडगाव, आणि नगर तालुक्यातील एका गावात कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरातील बराच मोठा भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला आहे व सिलबंद केला आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत.

तसेच साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. गोरगरीब लोकांना नोव्हेंबर 2020 पर्यंत धान्य व चना डाळ मोफत उपलब्ध होणार असल्याचे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीर केले आहे. नागरिक हो अहमदनगर जिल्ह्यातील भय अजुन संपले नाही याची जाणीव असू द्या.

जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी दिलेल्या आदेशाची काटेकोर पणे अमलबजावणी व पालन करावे ही नम्र विनंती. कोरोना वर एकच लस आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे हे होय. हे पांडूरंगा देशावर आलेल्या या कोरोना महामारी च्या संकटाला लवकर दूर कर बा विठ्ठला. नागरिकांनी सुद्धा आपल्या परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद.

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button