Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

धक्कादायक : उद्योजकाला तलवारीने तुकडे करण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : दारूचा धंदा करण्यासाठी शेतजमीन दिली नाही, या रागातून विलास रामदास कोठवळे यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अनिकेत कोठावळे यास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सांगवी सूर्या येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जेरंबंद केले.

विलास कोठावळे (सांगवी सूर्या, हल्ली राहणार नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी त्यांची सांगवी येथील शेतजमीन दारूच्या धंद्यासाठी दिली नाही, या रागातून अनिकेत कोठावळे व सुधीर कोठावळे यांनी त्यांना धमकावले.

विलास कोठावळे हे मंगळवारी विवाहाच्या निमित्ताने सांगवी येथे आले असता त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अनिकेतने त्याच्याजवळील गावठी कट्टा रोखला, तर सुधीरने तलवार उगारून तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश इंगळे, दत्ता हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, भागीनाथ पंचमुख, अण्णा पवार, सचिन आडबल,

विनोद मासाळकर, योगेश सातपुते, प्रकाश वाघ, बाळासाहेब भोपळे यांनी माहिती मिळवत अनिकेत यास पकडण्यासाठी सापळा रचला. चाहूल लागल्याने तो पळून जाऊ लागला.

मात्र, पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेण्यात आली असता कमरेला खोचलेले २५ हजार रूपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, ४०० रूपये किमतीची दोन जिवंत काडतुसे,

१० हजारांचा मोबाइल असा ३५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला.तो पोलिसांनी जप्त केला. विलास कोठावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नासह हत्यार प्रतिबंधात्मक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button