उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला. 

या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या पुजा मेहेत्रे, नगरसेवक डाॅ संदीप बरबडे, सामाजिक कार्यकर्ते ओकांर तोटे, मा उप सरपंच संतोष मेहेत्रे आदी उपस्थित होते. घुले पुढे म्हणाले की, आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गेली पंचवीस वर्षातील आपला भ्रष्टाचार झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करत असून,   आमदार रोहित पवार यांच्या विकासाचा विचार रुचत नसल्याने त्याच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच महापुरुषांच्या नावाने स्वतः राजकारण करत असल्याची टीका ही घुले यांनी केली.
यावेळी विरोधी पक्ष नेत्या पुजा मेहेत्रे यांनी या पत्रकार परिषदेत त्यांनी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या वर आरोप करताना म्हटले की,  कर्जत नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार राज सुरू आहे, त्याला आता ब्रेक लागल्याचे लक्षात आल्याने राऊत यांचा तिळपापड झाला असून पवार यांच्या विरुद्ध बोलण्यास मुद्दाच नसल्याने राऊत यांनी कर्जतकरांची दिशाभूल करण्याचा डाव आखला आहे, असे म्हणत विरोधी पक्ष नेत्या पूजा संतोष मेहेत्रे यांच्या सह काँग्रेसच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणेच पत्रकारापुढे मांडली व थेट त्या त्या चौकात जाऊनच यावर भाष्य केले.
कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या समाधी मंदिर असलेल्या पवित्र गल्लीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे करताना जे दिवे लावले आहेत त्यातील अनेक दिवे चालूच नाहीत तर काही लुकलूक करत आहेत याचाच अर्थ या कामात मोठा भ्रष्टाचार केला गेला असून हा खरा आपल्या ग्रामदैवताचा अवमान नव्हे काय? असा प्रश्न उपस्थित करत श्री गोदड महाराजाच्या विकास कामात भ्रष्टाचार करणे हा थेट ग्रामदैवताचा अवमान असल्याचे नगरसेवक सचिन घुले यांनी दाखवून दिले आहे.
जैन समाजाचे स्मारक बाजारतळ येथे उभारले आहे जे दीड ते दोन लाख रुपयात झाले असून  त्यासाठी साडे पाच लाख रुपये काढले गेले आहेत याठिकाणी त्यावर साधा एक दिवाही लावलेला नाही हा खरा अवमान आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्जत मध्ये ज्या ठिकाणी येऊन गेले त्या ठिकाणी नगरपंचायतने स्मारक म्हणून इमारत बांधली असून एका वर्षात थोडा पाऊस झाला तरी ही इमारत गळू लागली आहे, म्हणजेच लाखो रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून हा खरा महापुरुषाचा अवमान आहे.
यापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे करमाळा रोड येथे एक स्तंभ उभारला असून त्यासाठी तेरा लाख खर्च केले आहेत व हे काय आहे हे पण समजत नाही, तर म्हसोबा गेट असो, कापरेवाडी वेस असो वा अण्णाभाऊ साठे चौक म्हणून जेथे उभारणी करावयाची आहे ती जागा असो या ठिकाणी एक रुपयाचेही सजावटीचे काम न करता मोठ्या प्रमाणात पैसा मात्र काढण्यात आला आहे, हा त्या दैवताचा अथवा महापुरुषांच्या नावाचा अवमान नाही का ?  असा खणखणीत सवाल काँग्रेसच्या नगरसेवकानी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेत्या पूजा संतोष मेहेत्रे, नगरसेवक सचिन घुले, नगरसेवक डॉ संदीप बरबडे, संतोष मेहेत्रे व ओंकार तोटे यांनी प्रत्यक्ष त्या त्या चौकात जाऊन यावर भाष्य केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment