ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

यंदा गुरूपौर्णिमे निमीत्त साईभक्तांनी करावे ‘हे’ काम !

0

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोरोनामुक्त झालेल्या भाविकांनी गुरूपौर्णिमे निमीत्त रक्तातील प्लाझमाचे दान करून बाबांच्या रूग्णसेवेच्या कार्याला हातभार लावावा, अशी भावनिक साद साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी घातली आहे़.

बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझमा दान देवु इच्छिणाºया भाविकांनी पुर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर रक्तदान केंद्रावर जावुन यासाठी रक्तदान करावे व आपला फोटो,

Advertisement

नाव, पत्ता व डोनेशन कार्ड संस्थानला माहितीसाठी मेलवर पाठवावे असे आवाहन त्यांनी केले़. तसेच साईसंस्थानच्या रूग्णालयालाही सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे़

रक्ताच्या उपलब्धतेसाठी संस्थानच्या रक्तपेढीने यंदा गुरूपौर्णिमेच्या दिवशी साईआश्रम येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे़.

Advertisement

स्थानिक भाविकांनी, ग्रामस्थांनी व कर्मचाºयांनी या शिबीरात रक्तदान करून सार्इंचा रूग्णसेवेचा वारसा अधिक दृढ करावा, असे आवाहनही डोंगरे यांनी केले़.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li