ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मोठी बातमी : अहमदनगरमध्ये ‘या’ तारखेपर्यंत संचारबंदी !

0

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे, असा आदेश शुक्रवारी (दि.३ जुलै) जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला आहे.

Advertisement

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कोणतीच परवानगी असणार नाही,असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

जिल्हाधिका-यांनी काढलेला हा आदेश ३ ते १७ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. यात तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यक्तीरिक्त इतर कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही.

हा नियम शासकीय, निमशासकीय, महामंडळे इतर आस्थापना असलेले अधिकारी, कर्मचारी, रुग्णालये, दवाखाने, औषधालये, इलेक्टीसिटी, पेट्रोल पंप, प्रसार माध्यमे, होम डिलेवरी सेवा, अत्यावश्यक सेवा यांना लागू राहणार नाही.

Advertisement

नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पथकांची स्थापना केली आहे. ही पथके नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तरी नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिका हद्दीत कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li