सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांच्यावरील जनतेचा असलेला विश्वास आणखी वाढला असून देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाला केंद्र सरकार धैर्याने तोंड देत आहे,

नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी होण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्व स्तरावर मदत करत असल्याचे

चित्र राज्यात असताना राज्यसरकार आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्या टर्ममधील पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले जात आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजप नेते, माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी व्हर्च्युअल सभेदरम्यान महाजन बोलत होते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार महाजन यांच्याशी संवाद साधला.

आमदार महाजन म्हणाले, केंद्र सरकारच्या कलम ३७०, राममंदिर, तिहेरी तलाक, पंतप्रधान किसान सन्मान योजना, जनधन योजना, सर्जिकल स्ट्राईक, मोफत उज्ज्वला गॅस योजना, आरोग्य सेतू, नागरिकत्व कायदा,

वयाच्या साठीनंतर पेन्शन योजना, बचतगटाशी जोडलेल्या भगिनींना आणखी आर्थिक सहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरजूंना मोफत अन्नधान्य या मोदी सरकारच्या काळातील लोकप्रिय योजना आहेत.

आत्मनिर्भर भारत अभियानासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देऊन भारतीयांसाठी नव्या संधीची दारे उघडली. कोरोना महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने दिलेली मदतही राज्य सरकार जनतेपर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही, त्यांचा हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्रावर आखपाखड केली जात आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment