पारनेर तालुक्यातील या गावात आढळले 5 रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  आज दिवसभरात जिह्यात तब्बल 33 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात 5 रुग्ण हे पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील आहेत. तर याच तालुक्यातील कुंभारवाडी येथील एकाचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.यात संगमनेर तालुक्यातील13 तर नगर शहरातील गवळीवाडा, पाईपलाईन, हडको, ढवण वस्ती, चितळे रोड येथील रुग्ण आढळले.

दरम्यान सायंकाळी आणखी ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

त्यामुळे दिवसभरात एकूण 33 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment