ठाण्यातून कोरोना घेवून आला ….तहसील कार्यालयातील कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : नेवासा तहसील कार्यालयातील एक कर्मचारी विनापरवाना ठाणे येथे जावून आला होता. 

त्याला त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालयातही खळबळ उडाली आहे.

हा कर्मचारी नेवासा फाटा येथे एका ग्रामपंचायतीच्या व्यक्तीकडे राहत असल्याने कोरोना समिती ही इतरांना क्वॉरंटाईन करत असताना तहसील कार्यालयातील याला क्लिनचिट दिली होती.

येथील ग्रामपंचायतीची दक्षता समिती बाहेर गावाहून आलेल्या रहवासीयांनाही क्वॉरंटाईन करुनच गावात प्रवेश देत असताना आता तहसील कार्यालयातील कर्मचारी विनापरवाना ठाण्यातून कोरोना घेवून आला अन् नेवासा फाटा गावाला बाधा निर्माण केली.

या कर्मचार्‍याची दक्षता न घेणार्‍या ग्रामदक्षता समितीवर तहसीलदार कारवाई करणार की आपल्या कर्मचार्‍याला वाचविणार असा सवालही ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

गावात दक्षता समितीच्या दुर्लक्षामुळे कोरोना पसरल्याने या दक्षता समितीवर कारवाई होणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment